नागपूर शहर: प्रियकराने लग्नास नकार दिल्याने १९ वर्षीय तरुणीची आत्महत्या; आरोपी ताब्यात : प्रवीण काळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी 9 सप्टेंबरला दुपारी 4:30 ला दिलेल्या माहितीनुसार कळमना पोलीस ठाणे हद्दीत प्रियकराने लग्नास नकार दिल्याने १९ वर्षीय सीमा बृजलाल वर्मा या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.सीमा आणि आशिष युवराज शिल्लारे यांच्यात गेल्या एक वर्षापासून प्रेमसंबंध होते. आशिषने लग्नाचे आश्वासन दिले होते, मात्र नंतर तो टाळाटाळ करू लागला. "तू मरून गेलीस तरी तुझ्याशी लग्न करणार नाही," असे अपमानजनक शब्द आशिषने उच्चारल्याने निराश होऊन सीमाने हे टोकाचे