नागपूर शहर: दरोड्याच्या तयारीत असलेले ४ जण जेरबंद, गुन्हे शाखा सोनसाखळी विरोधी पथकाची कारवाई
8 सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून दरोड्याच्या तयारीतील ४ आरोपींना अटक केली असून, अंधाराचा फायदा घेऊन काही आरोपी पसार झाले. आरोपींकडून धारदार चाकु, लोखंडी कटर, टॉमी, मिरची पावडर आणि ४ मोबाईल असा एकूण ६१,१५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे नंदनवन आणि गणेशपेठ परिसरातील सोन्याची चेन लांबवल्याच्या घटना उघडकीस आल्या असून, एकूण ८५,००० रुपयांचे सोन्याचे दागिने फसवणुकीने चोरल्याचे समोर आले आहे.अटक केलेल्या आरोपींचे साथीद