नागपूर शहर: नागपूरची मारबत ठरली ग्लोबल! परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीत फडणवीसांची रोखठोक भूमिका
समाजातील इडा-पिडा आणि वाईट शक्तींचा नाश व्हावा या उद्देशाने नागपुरात दरवर्षी अत्यंत उत्साहात साजरा होणारा ऐतिहासिक 'मारबत उत्सव' यंदा खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर पोहोचला आहे. या उत्सवाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महानगरपालिकेच्या प्रयत्नांचे कौतुक करत महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. तसेच, MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राजकारण करणाऱ्या विरोधकांचा समाचार घेत जरांगे पाटलांच्या भूमिकेवरही त्यांनी परखड भाष्य केले.