नागपूर शहर: गुन्हे शाखा वाहनचोरी विरोधी पथकाची मोठी कारवाई: ३० लाखांचा मुद्देमाल जप्त
11सप्टेंबरला सकाळी 10:30 वाजता मिळालेल्या माहितीनुसार चोरीच्या वाहनांचे सुटे भाग करून ट्रकमध्ये भरून मध्य प्रदेश येथे विक्रीसाठी पाठवणारी रॅकेट उघडकीस आली आहे. पोलिसांनी सापळा रचून ट्रकसह ३०,००,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन जणांना अटक केली आहे. मोहम्मद वलीजान अब्दुल मयान आणि मोहम्मद साबीर अब्दुल ममन अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.दोन्ही आरोपी विरुद्ध कॉपिलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.