भक्ती दळवे विभागात पहिली! महाराष्ट्र राज्यासाठी निवड
उदगीर : महाराष्ट्र राज्य शालेय क्रीडा धनुर्विद्या विभागीय स्पर्धा धाराशिव येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत विद्यावर्धिनी स्कूल उदगीरची विद्यार्थिनी भक्ती संजय दळवे हिने विभागात प्रथम क्रमांक पटकावत महाराष्ट्र राज्यासाठी निवड मिळवली आहे.
गुरुकुल स्पोर्ट क्लब उदगीरचे संस्थापक व मार्गदर्शक मारुती बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तीने हे यश संपादन केले. तिच्या अचूक लक्ष्यवेधाने संपूर्ण विभागात बाजी मारली.
२०२२ मध्ये उदगीरमध्ये आर्चरी या खेळाची माहितीही नव्हती. बिरादार सरांनी या मातीत या खेळाचे पहिले बीज रोवले. त्यांच्या स्वप्न, मेहनत आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आज उदगीरमधून राष्ट्रीय व राज्य स्तरावर चमकणारे आर्चरीपटू घडत आहेत.
भक्तीच्या या यशामुळे संपूर्ण परिवाराचा, गावाचा आणि परिसराचा उंच अभिमान आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
अभिमान उदगीरचा... अभिमान नेतृत्वाचा!
Latur, Latur | Nov 7, 2026