आधुनिक शेतीचे ज्ञान घेण्यासाठी अतिदुर्गम भागातील 43 शेतकरी कृषीदर्शन दौऱ्यावर!
गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकी व ‘प्रोजेक्ट कृषी समृद्धी’ अंतर्गत भामरागड उपविभागातील अतिदुर्गम भागातील 43 शेतकरी 18 व्या कृषीदर्शन व अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले.
दि. 26 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2026 या 09 दिवसांच्या दौऱ्यात शेतकरी विविध कृषी विज्ञान केंद्रे व शेती प्रक्षेत्रांना भेट देऊन आधुनिक शेतीपद्धती, प्रगत तंत्रज्ञान आणि शेतीतील नव्या संधींची प्रत्यक्ष माहिती घेणार आहेत.
आतापर्यंत आयोजित 17 कृषीदर्शन सहलींचा 775 महिला व पुरुष शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे.
नवे ज्ञान • आधुनिक तंत्रज्ञान • समृद्ध शेती
शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी ‘प्रोजेक्ट कृषी समृद्धी’!
#GadchiroliPolice #ProjectKrushiSamruddhi #DadaloraKhidki #Farmers #Agriculture CommunityPolicing Gadchiroli MaharashtraPolice