प्रतिबंधित सुगंधित तंबाखूवर गडचिरोली पोलिसांचा मोठा प्रहार!
पोलीस मदत केंद्र गट्टा (फु.) पथकाने प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैध निर्मिती व साठवणूक करणाऱ्यांविरोधात कारवाई करत ₹22,50,230/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
कारवाईत सुगंधित तंबाखूचा मोठा साठा, उत्पादन व पॅकिंगसाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री आणि महिंद्रा स्कॉर्पिओ वाहन जप्त करण्यात आले. प्रकरणात 04 आरोपींना अटक करण्यात आली असून एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या फिर्यादीवरून अपराध क्र. 54/2026 नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
प्रतिबंधित तंबाखूच्या अवैध व्यवसायाला आळा…
कायद्याची कठोर अंमलबजावणी!
#GadchiroliPolice #PoliceAction #Gatta #IllegalTobacco #TobaccoFree CrimePrevention MaharashtraPolice Gadchiroli