आत्मसमर्पणातून नवजीवनाकडे… ‘प्रोजेक्ट संजीवनी’ची भक्कम साथ!
गडचिरोली पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’ अंतर्गत आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसाठी दि. 15 सप्टेंबर 2026 रोजी पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे तसेच दि. 17 सप्टेंबर 2026 रोजी पोलीस उप-मुख्यालय (प्राणहिता), अहेरी येथे भव्य जनजागरण मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले.
मेळाव्यात विविध शासकीय पुनर्वसन योजना, रोजगार व स्वयंरोजगार, कौशल्य विकास व आरोग्य सुविधांची माहिती देण्यात आली. तसेच आधार कार्ड, ई-श्रम कार्ड, आयुष्मान भारत कार्डसह पुनर्वसन निधीचे धनादेश वितरित करण्यात आले व आरोग्य तपासणी करण्यात आली.
नवी ओळख • नवा आत्मविश्वास • सन्मानाचे नवजीवन
#gadchirolipolice #surrender #projectsanjivani #gadchirolinews
90 views | Gadchiroli, Maharashtra | Sep 17, 2026