गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आत्मसमर्पित माओवादी सदस्यांच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी 15 सप्टेंबर 2026 रोजी पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे तसेच 17 सप्टेंबर 2026 रोजी पोलीस उप-मुख्यालय (प्राणहिता), अहेरी येथे भव्य जनजागरण मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले.
मेळाव्यात आत्मसमर्पित सदस्यांना शासनाच्या विविध पुनर्वसन योजना, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, कौशल्य विकास आणि आरोग्य सुविधांची माहिती देण्यात आली. तसेच आधार कार्ड, ई-श्रम कार्ड, आयुष्मान भारत कार्डसह विविध योजनांची कागदपत्रे लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आली आणि वैद्यकीय तपासणीही करण्यात आली.
#gadchirolipolice #maharashtrapolice #gadchiroli #policeforpeople
293 views | Gadchiroli, Maharashtra | Sep 19, 2026