गडचिरोली फाईल्स | हिंसेच्या अंधारातून शांतता, सुरक्षा आणि विकासाच्या नव्या पर्वाकडे!
चार दशकांच्या माओवादी हिंसेच्या आव्हानांवर मात करत गडचिरोली आज शांतता, विश्वास आणि विकासाची नवी ओळख घडवत आहे.
पोलीस–जनता संवाद आणि विश्वास दृढ करत ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’च्या माध्यमातून आत्मसमर्पणाला प्रोत्साहन देण्यात आले. आत्मसमर्पित सदस्यांसाठी कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार, शिक्षण, आरोग्य आणि समाजात सन्मानाने पुनर्वसनाची नवी वाट निर्माण करण्यात आली.
आत्मसमर्पित सदस्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्यांमध्ये सुरक्षितपणे परतण्यास सहकार्य करत नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी गडचिरोली पोलीस दल त्यांच्या पाठीशी उभे आहे.
भूतकाळ हिंसेचा… वर्तमान विश्वासाचा… भविष्य विकासाचे!
माओवादमुक्त आणि भयमुक्त गडचिरोली — शांतता, सुरक्षा आणि विकासाचा संकल्प!
#GadchiroliPolice #GadchiroliFiles #MaharashtraPolice #NewGadchiroli #PeaceAndDevelopment