
सिगारेट न दिल्याने दगडाने मारहाण; गुन्हा दाखल
उदगीर :सिगारेट देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका व्यक्तीस शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत दगडाने पायावर वार करून जखमी केल्याची घटना उदगीर तालुक्यातील लोहारा येथे घडली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत फिर्यादी योगेंद्र शिवाजी भुरे (रा. लोहारा) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास फिर्यादी हे त्यांच्या घरासमोर असताना आरोपी अनिल संग्राम कांबळे (रा. लोहारा) यांनी फिर्यादीकडे सिगारेटची मागणी केली. मात्र, सिगारेट न दिल्याच्या कारणावरून आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दगडाने डाव्या पायावर मारून त्यांना जखमी केले.
याशिवाय, 'मला सिगारेट दिली नाहीस तर तुला जिवंत सोडणार नाही,' अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
#Udgir #UdgirNews #UdgirCrime #Lohara #LaturNews #LaturCrime #LaturBreaking #CrimeNews #UdgirGruralPolice #LaturPolice #MaharashtraCrime #MarathiNews #BreakingNews #PunyaNagari #UdgirGrural #LaturDistrict #LoharaNews #CigaretteDispute #AssaultCase #PoliceCase #MarathiBatmi #LaturToday #LaturUpdate #PrimeLiveNews #UdgirKar
Latur, Latur | Nov 7, 2026