
स्कॉर्पिओत गुटख्याचा साठा! उदगीरमध्ये १३ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त
उदगीर : शासनाने प्रतिबंधित केलेला पानमसाला, सुगंधित तंबाखू व गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्यावर उदगीर ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. लोणी मोड येथे स्कॉर्पिओ गाडीची तपासणी केली असता त्यात तब्बल ४ हजार ८० पुडे गुटखा व तंबाखू आढळून आला. जप्त मुद्देमालाची किंमत १३ लाख ७७ हजार ९६० रुपये आहे.
दि. ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता लोणी मोड, उदगीर येथे ही कारवाई करण्यात आली. पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा स्कॉर्पिओ (एमएच १४ सीएच ३२३२) मधून शासनाने प्रतिबंधित केलेला पानमसाला, सुगंधित तंबाखू विक्रीसाठी वाहतूक करताना आरोपी मिळून आला.
या प्रकरणी निसार हसनमिया शेख (वय ४९, रा. गवळी पुरा, स्टेशन रोड, नांदेड) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस अंमलदार बजरंग नागनाथ गज्जलवार यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७९६/२०२६ कलम १२३, २२३, २७४, २७५, ६२ बीएनएस सह कलम ५९ अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त केलेला माल असा - विमल पान मसाला १२४८ पुडे, व्हि-१ तंबाखू १२४८ पुडे, विमल किंग पॅक ४४० पुडे, व्हि-१ किंग पॅक ४४० पुडे, डायरेक्टर स्पेशल पान मसाला २२५ पुडे, शॉट लग्झरी चेंबींग तंबाखू २२५ पुडे, प्रिमीयम रजनीगंधा २४ पुडे आणि महिंद्रा स्कॉर्पिओ असा एकूण १३,७७,९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलीस हवालदार संदीप केंद्रे, पोलीस अंमलदार नामदेव चेवले, राजकुमार डबेटवार, बजरंग गज्जलवार, राजकुमार देवडे यांनी केली.
पुढील तपास पोउपनि तिडके हे करीत असून, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पो.नि. डी. डी. गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
#Udgir #UdgirGramin #UdgirPolice #UdgirNews #Latur #Gutkha #AvadhGutkha #PanMasala #CrimeNews #BreakingNews #Maharashtra #MaharashtraTimes #Mata #MarathiNews #PoliceAction #PrimeLiveNews
Latur, Latur | Nov 8, 2026