सेलू: महामार्गावरील रमना फाट्याजवळ राज्य परिवहन महामंडळाच्या बसची दुचाकीला धडक; एक जण गंभीर जखमी
Seloo, Wardha | Sep 26, 2024 वर्धेवरून नागपूरकडे जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसने दुचाकीला धडक दिल्याने त्यात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. ही घटना आज ता. २६ गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास वर्धा-नागपूर महामार्गावर रमना फाट्याजवळ घडली. बाबा चौधरी वय ६५ रा. झडशी असे जखमीचे नाव सांगण्यात आले. जखमीला लागलीच रुग्णवाहिकेतून नागपूर येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे.