सेलू: कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली तिघांनी १२ जणांची २ लाख ८४ हजार ४३८ रुपयांची फसवणूक, सेलू पोलिसांत गुन्हा दाखल
Seloo, Wardha | Sep 25, 2024 कर्ज मिळवून देतो असे सांगून तीन व्यक्तींनी अनेकांना चुना लावला असून सेलू पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या 12 जणांना भामट्यांनी 2 लाख 84 हजार 438 रुपयांनी गंडविल्याचा प्रकार ता. 23 सोमवारी सायंकाळी 7.30 वाजता पोलिसांत तक्रार झाल्यानंतर उघडकीस आला. याप्रकरणी निलेश बळीराम गव्हाळे रा. खापरी (मुंगापूर) यांच्या फिर्यादीवरून तीन आरोपींवर विविध कलमान्वये सेलू ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.