सेलू: धामणगाव येथे गावठी मोहा दारू विकणाऱ्या महिलेवर पोलिसांची कारवाई, सेलू पोलिसांत गुन्हा दाखल
Seloo, Wardha | Sep 23, 2024 गावठी मोहा दारूची विक्री करणाऱ्या महिलेवर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. ही कारवाई ता. 22 रविवारी दुपारी 4 वाजताचे सुमारास तालुक्यातील धामणगाव येथे सेलू पोलिसांनी केली. लता लक्ष्मण बावणे वय 41 रा. धामणगाव असे कारवाई करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिचेकडून गावठी मोहा दारुसह 1 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी आज ता. 23 सोमवारला सकाळी 10 वाजता गुन्हा नोंद केला आहे.