सेलू: दिग्रज येथे वीज पडून 2 बैल जागीच ठार, शेतकऱ्याचे 2 लाख रुपयांचे नुकसान, नुकसान भरपाई देण्याची मागणी
Seloo, Wardha | Sep 24, 2024 विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसात शेतात बांधून असलेल्या बैलांच्या अंगावर वीज कोसळून बैल जोडी जागीच ठार झाली. ही घटना आज ता. 24 मंगळवारी सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास सिंदी नजीकच्या मौजा दिग्रज शिवारात घडली. यात शेतकरी धीरज मोरेश्वर टेंभरे राहणार दिग्रज यांचे 2 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.