सेलू: घरकुलासह विविध मागण्यांसाठी तुळजापूरच्या ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिले निवेदन
Seloo, Wardha | Sep 25, 2024 सेलू तालुक्यातील तुळजापूर येथे घरकुल योजनेचा लाभ मिळावा या मागणीसह गावातील रस्ता, समाजभवन, दलित वस्तीतील रस्ता, नाल्यावरील पूल आणि शुद्ध पाणी उपलब्ध होण्याकरिता कामगार नेते उमेश वावरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. आज ता. 24 मंगळवारी दुपारी 4.30 वाजता तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदार मलिक विराणी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी कामगार नेते उमेश वावरे यांनी तहसील प्रशासनासोबत चर्चा करून मागणी लावून धरली.