सेलू: घोराड येथे शिवीगाळ करून एकाला दिली मारण्याची धमकी, सेलू पोलिसांत एकावर गुन्हा दाखल
Seloo, Wardha | Sep 30, 2024 मुलीला फोन करून त्रास का देतो असे विचारण्यास गेलेल्या इसमास अश्लील शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याची घटना घोराड येथे ता. 30 सोमवारी सकाळी 10 वाजता घडली. याप्रकरणी देविदास चिंतामण धापूडकर वय 54 रा. वॉर्ड क्रमांक 4 सेलू यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रणय लोहकरे याचे विरुद्ध दुपारी 12 वाजता गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली.