सेलू: जयपूर व रेहकी येथे गावठी दारू भट्टी आणि गावठी दारू विक्रेत्यावर पोलिसांची कारवाई; 50 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल नष्ट
Seloo, Wardha | Sep 28, 2024 गावठी मोहा दारूच्या रानींग भट्टीवर आणि गावठी मोहा दारू विक्रेत्यावर धाड घालून पोलिसांनी 50 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून नष्ट केला. ही कारवाई ता 28 शनिवारी मौजा जयपूर शिवारात आणि रेहकी येथे सेलू पोलिसांनी केली. याप्रकरणी पुंडलिक बावणे रा. जयपूर व रुपेश नारायण मुंगले वय 28 रा. रेहकी यांच्यावर शनिवारला दुपारी 4 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती सेलू पोलिसांनी दिली.