सेलू: कामठी येथे सासरा आणि भासऱ्याने सुनेला केली अमानुष मारहाण, सेलू पोलिसांत गुन्हा दाखल
Seloo, Wardha | Sep 30, 2024 घराच्या अंगणात उभ्या असलेल्या सुनेला सासरा व भासऱ्याने अमानुषपणे मारहाण करून दुखापत केली. ही घटना ता. 29 रविवारी सकाळी 10.30 वाजता सुमारास सुरगाव जवळच्या कामठी येथे घडली. याप्रकरणी सौ. रुपाली अनिल रंगारी वय 24 वर्ष रा. कामठी यांच्या फिर्यादीवरून आरोपी मधुकर पंढरी रंगारी (सासरा) व अमोल मधुकर रंगारी (भासरा) दोघेही रा. कामठी यांच्या विरोधात आज रविवारी सायंकाळी 6.30 वाजता गुन्हा नोंद केला आहे.