सेलू: वडगांव (जंगली) येथे घरासमोर उभ्या असलेल्या व्यक्तीस दिली जीवे मारण्याची धमकी, सेलू पोलिसांत तक्रार दाखल
Seloo, Wardha | Sep 28, 2024 घरासमोर बाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीला शेजारीच राहणाऱ्या इसमाने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना तालुक्यातील वडगांव (जंगली) येथे ता. 27 गुरुवारी घडली. याप्रकरणी सुरेश शामरावजी कुकडकर वय 48 रा. वडगांव (जंगली) यांनी सुभाष शेंदरे रा. वडगाव (जंगली) याचे विरुद्ध ता. 27 शुक्रवारला दुपारी 2 वाजता तक्रार दाखल केली आहे. अशी माहिती आज शनिवारी सेलू पोलिसांनी दिली.