हवेली: भवानी पेठ येथे धोकादायक इमारतीमधील शाळा बंद करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे शिवाजीनगर येथे पालिकेसमोर आंदोलन
Haveli, Pune | Jun 5, 2025 भवानी पेठ येथे सहकारी गृह रचना संस्थेच्या धोकादायक इमारतीमध्ये सुरू असलेली ऑर्किड स्कूल ही प्राथमिक शाळा बंद करा. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात शिवाजीनगर या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या गेट समोर आंदोलन करण्यात आले.