लोणी काळभोरमध्ये मोहरम उत्साहात, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे झाले दर्शन
लोणी काळभोर, ता. २६ : ‘या हुसेन... या हुसेन...’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. पारंपरिक सवाऱ्यांचा थरार, पंजा भेटीचा भावनिक सोहळा तसेच सरबत व प्रसादाच्या वाटपातून लोणी काळभोर (ता. हवेली) येथे मुस्लिम बांधवांनी शुक्रवारी (ता. २६) मोहरम उत्सव अत्यंत श्रद्धा, उत्साह आणि भक्तिभावाने साजरा केला. या निमित्ताने हिंदू-मुस्लिम ऐक्याचे सुंदर दर्शन घडले.
प्रिंट व डिजिटल मिडिया पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र उर्फ बापूसाहेब काळभोर, हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी उर्फ युगंधर काळभोर तसेच लोणी काळभोरचे प्रशासक सरपंच नागेश काळभोर, उद्योजक गफूर शेख, पुणे प्राईम न्यूजचे उपसंपादक विशाल कदम यांनी आलमगीर जामा मस्जिद येथे जाऊन ताबूताचे दर्शन घेतले. आलमगीर जामा मस्जिद येथे कुराण पठणानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास वाद्यांच्या गजरात ताबूताची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीत सहभागी भाविकांसाठी मुस्लिम जमातीतर्फे सरबताचे वाटप करण्यात आले. लोणी काळभोर पोलिस ठाण्यासमोर ताबूत आल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दर्शन घेऊन मुस्लिम बांधवांना मोहरमच्या शुभेच्छा दिल्या. हसन आणि हुसेन यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ मोहरम साजरा केला जातो. हा सण त्याग, श्रद्धा आणि मानवतेचा संदेश देणारा असून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणूनही त्याकडे पाहिले जाते, अशी भावना मुस्लीम बांधवांनी व्यक्त केली.
.
.
.
#LoniKalbhor #Muharram #Muharram2026 #HinduMuslimUnity #CommunalHarmony #PuneNews #YaHusain #LoniKalbhorNews #UnityInDiversity #PeaceAndHarmony #Tradition #SocialUnity
Haveli, Pune | Jun 27, 2026