काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी मातोश्री निवासस्थानी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतली भेट
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी आज मातोश्री निवासस्थानी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.या भेटीनंतर सपकाळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. “प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटण्यासाठी आलो होतो. आमच्यात एक चांगली चर्चा झाली. आपला महाराष्ट्र धर्म कसा असला पाहिजे, यावर आम्ही चर्चा केली.