माहीम मध्ये कचऱ्याला भीषण आग वाहतुकीवर परिणाम.
आज दिनांक 15 मे 2025 वेळ सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांच्या सुमारास माहीमच्या केमकर चौक रहेजा पूल येथील कचऱ्याला भीषण आग लागली आहे या आगीमुळे उत्तरेकडे जाणारी वाहतूक संत गतीने सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली असून या आगीचे धुराचे लोळ दूरपर्यंत मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत सदरची आग पूर्णता अग्निशामक दलाच्या नियंत्रणात असल्याची माहिती समोर येत आहे