पालघर: उधवा येथे आमदार विनोद निकोले यांच्या उपस्थितीत आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न
पालघर जिल्ह्यातील तलासरीतील उधवा येथे आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले यांच्या उपस्थितीत 22 आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा आदिवासी परंपरेप्रमाणे धावलारी माध्यमातून संपन्न झाला. ग्रामपंचायत व डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून देण्यात आलेल्या गृहपयोगी वस्तूंचे आमदारांच्या हस्ते वितरण करण्यात आले. याप्रसंगी डॉक्टर असोसिएशन व्यापारी असोसिएशन उधवा परिसरातील मान्यवर वधूवरांचे कुटुंबीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.