पालघर: हालोली बालाजी ढाबा परिसरात अमली पदार्थांचा साठा जप्त; मनोर पोलिसांत गुन्हा दाखल
राष्ट्रीय महामार्गावर हालोली येथील बालाजी ढाबा परिसरात अमली पदार्थ विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने सदर ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी अमली पदार्थांचा साठा आढळून आला. 7 किलो अफूची पावडर आणि 1 किलो 760 ग्रॅम अफूचे सुकलेले बोंडे व चुरा असा अमली पदार्थाचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे याप्रकरणी आरोपी अनिल पप्पूराम बिश्नोई याच्याविरोधात मनोर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.