पालघर: जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुल येथे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन
पालघर जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, क्रीडा क्षेत्रातील खेळाडू, प्रशिक्षक आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.