सावनेर: डिफेन्स न्यूक्लियर कॉरिडॉरला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; सावनेर तहसील कार्यालयावर घडक
Savner, Nagpur | Aug 7, 2026 डिफेन्स न्यूक्लियर कॉरिडॉरला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; सावनेर तहसील कार्यालयावर घेराव सावनेर | प्रतिनिधी सावनेर परिसरात प्रस्तावित डिफेन्स न्यूक्लियर कॉरिडॉरसाठी जमीन संपादनाच्या हालचालींना विरोध करत आज प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी सावनेर तहसील कार्यालयावर जोरदार मोर्चा काढत घेराव घातला. मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी वाचविण्याचा निर्धार व्यक्त करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी शेतकऱ्यांनी तहसीलदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) यांना निवेदन देत, को