पालघर: आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे स्मृतिदिनानिमित्त ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे अभिवादन; खासदार हेमंत सावरा यांची उपस्थिती
आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या 177 व्या स्मृतिदिनानिमित्त ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली महाराष्ट्र शाखा यांच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी यावेळी राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेस पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन केले. याप्रसंगी आदिवासी विकास मंत्री अशोक ऊइके, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, वैभव पिचड त्याचप्रमाणे आदिवासी बांधव पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.