हिंगणा: दृश्यम स्टाईल खुनाचा थरार, शिक्षकाने प्रियसीचा केला खून.. गाडले घरात
Hingna, Nagpur | Oct 19, 2026 19 ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार अनैतिक संबंधातून चंद्रपूर येथील एका शिक्षकाने ४५ वर्षीय महिलेची हत्या करून तिचा मृतदेह हिंगण्यातील आधार नगरी येथील स्वतःच्या रिकाम्या घरात पुरल्याची भीषण घटना उघडकीस आली आहे.संतोष भगवान साखरकर असे आरोपी शिक्षकाचे नाव असून, वैशाली विलास टिपले असे मृत महिलेचे नाव आहे. १४ ऑक्टोबर रोजी भांडण झाल्यानंतर आरोपीने तिच्या छातीवर भारी वस्तूने प्रहार करून हत्या केली. त्यानंतर मृतदेह कारच्या डिक्कीतून हिंगण्याला आणून घरातील खोली