“कॅगच्या अहवालात रेल्वे स्थानकांच्या पाण्याचा धक्कादायक खुलासा; CSMT, कल्याणसह ४१२ स्थानकांवरील पाण्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह!”
संसदेत सादर झालेल्या कॅगच्या अहवालात देशभरातील ५१२ रेल्वे स्थानकांवरील प्रवासी सुविधा आणि स्वच्छतेची तपासणी; ४१२ बिगर-उपनगरीय स्थानकांतील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेत त्रुटी आढळल्याचा अहवाल.
मध्य रेल्वेतील CSMT, कल्याण, भिवंडी रोड आणि लोणावळ्यासह दक्षिण रेल्वेतील कोईम्बतूर-पलक्काड, दक्षिण मध्य रेल्वेतील हैदराबाद आणि पूर्व रेल्वेतील मधुपूर स्थानकांचा अहवालात समावेश.
पाण्याच्या नमुन्यांमध्ये ‘टोटल कोलिफॉर्म’ आणि काही ठिकाणी ई-कोलाय जीवाणू आढळल्याची नोंद; दूषित पाण्यामुळे आरोग्याचा धोका निर्माण होण्याची चिंता.
कल्याण रेल्वे स्थानकाचा अहवालात समावेश असल्याने दररोज हजारो प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न; लांब पल्ल्याच्या गाड्यांसह लोकलने प्रवास करणारे प्रवासीही मोठ्या संख्येने पाणी वापरतात.
“स्थानकावर मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य; याच वातावरणात पाणी प्यावे लागते, त्यामुळे प्रवासी आजारी पडण्याची शक्यता” असा कल्याण स्थानकातील प्रवाशांचा संताप.
“रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना स्वच्छ आणि सुरक्षित पाणी द्यावे, स्थानकाची नियमित स्वच्छता करावी” अशी प्रवाशांची मागणी; कॅगच्या अहवालानंतर कल्याण स्थानकातील परिस्थितीवर प्रश्नचिन्ह.
केवळ पाणीच नाही तर ५१२ पैकी तब्बल ४५८ स्थानकांवर प्रतीक्षागृह, शौचालये, पंखे, कचरापेट्या, पादचारी पूल आणि इतर मूलभूत सुविधांमध्ये कमतरता आढळल्याचे कॅगचे निरीक्षण.
Kalyan, Thane | Aug 17, 2026