"गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला उचलून नेत गोदामात डांबून बेदम मारहाण"
कल्याण पश्चिमेत धक्कादायक प्रकार; गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला.
भाजपचे माजी नगरसेवक अर्जुन भोईर यांचा मुलगा मयूर भोईर आणि त्याच्या साथीदारांकडून विद्यार्थ्यांना घेरून बेदम मारहाण केल्याची माहिती समोर.
किरकोळ वादा नंतर हरवलेले पाकीट शोधण्यासाठी परत आलेल्या विद्यार्थ्यांवर 15 ते 20 जणांच्या टोळक्याचा हल्ला; लाठी, बांबू आणि लोखंडी रॉडचा वापर.
बिर्ला कॉलेजचा विद्यार्थी अथर्व देशमुख याला रस्त्यावरून उचलून नेत गोदामात डांबून शर्ट फाटेपर्यंत मारहाण; डोक्यासह शरीरावर गंभीर दुखापती.
मारहाणीत दोन जण जखमी, अथर्व गंभीर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू. मुलाला वाचवण्यासाठी वडिलांनी थेट गोदामात धाव घेतली. "पाच मिनिटे उशीर झाला असता तर माझा मुलगा जिवंत राहिला नसता," अशी वडिलांची भावनिक प्रतिक्रिया.
खडकपाडा पोलिसांत गुन्हा दाखल; मात्र गंभीर जखमी विद्यार्थ्याच्या तक्रारीबाबत कुटुंबीयांनी प्रश्न उपस्थित करत न्यायाची मागणी केली.
तर कुटुंब्याच्या आरोपानंतर संबंधित तरुणाचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मात्र १३ ऑगस्ट रोजी घटना घडून आणि गुन्हा दाखल होऊनही अद्याप आरोपींना अटक न झाल्याने जखमी कुटुंबाला न्याय मिळेल का आणि आरोपीला अटक होईल का असे प्रश्न उपस्थित
Kalyan, Thane | Aug 17, 2026