पालघर: वसई विरार महानगरपालिका मुख्यालय येथे वसई विजयोत्सव आढावा बैठक संपन्न
वसई विरार महानगरपालिका मुख्यालय येथे वसई विजयोत्सवा संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी विजय उत्सवाची रूपरेषा ठरवण्यात आली त्याचप्रमाणे स्मारक समितीतर्फे विविध सूचना देण्यात आल्या. या बैठकीस आयुक्ता अनिल कुमार पवार, नालासोपाराचे आमदार राजेंद्र नाईक, उपायुक्त संजय हेरवाडे माजी प्रथम महापौर राजीव पाटील, स्मारक समिती अध्यक्ष यशवंत पाटील, आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.