पालघर: जात निहाय जनगणनेच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे विरार येथे भाजपच्या वतीने स्वागत करत करण्यात आला जल्लोष
केंद्रातील मोदी सरकारने देशभरात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाच्या समर्थनार्थ भाजपच्या वतीने विरार येथे जल्लोष करण्यात केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, मिठाई वाटत, मोदी सरकार समर्थनार्थ घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा करत जल्लोष केला. भाजपचे विरार परिसरातील पदाधिकारी कार्यकर्ते, महिला आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्या यावेळी मोठ्या संख्येने सहभागी झाले.