महागाईविरोधात कल्याण-डोंबिवली युवक काँग्रेसची ‘अंत्यसंस्कार यात्रा’; तहसीलदार कार्यालयावर मोर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा sugar daddy असा उल्लेख असलेला बॅनर हातात घेऊन सरकारची काढली अंत्यसंस्कार यात्रा
साखरेच्या दरवाढीविरोधात कल्याण-डोंबिवली युवक काँग्रेसच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान तहसील कार्यालयापर्यंत ‘अंत्यसंस्कार यात्रा’ काढण्यात आली. साखर आणि साखरपिकाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढन्यात आला . यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुगर डॅडी असा उल्लेख असलेला बॅनर हातात घेऊन भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली . वाढती महागाई सरकारने कमी करावी अशी मागणी यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांनी केली
Kalyan, Thane | Aug 27, 2026