श्री मलंगगडावर नारळी पौर्णिमेचा उत्साह; श्री गोगादेवाची छडी दाखल, नाथांच्या गीतांनी गड दुमदुमला!
कल्याणजवळील ऐतिहासिक श्री मलंगगडावर नारळी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री मलंग मत्स्येंद्रनाथांना नारळी भाताचा नैवेद्य दाखवून भाविकांनी नारळ अर्पण केला.
नारळी पौर्णिमेनिमित्त श्री गोगादेवाची पवित्र छडी श्री मलंगगडावर दाखल झाली होती. यावेळी श्री नाथांचे पारंपरिक गीत गाऊन गड परिसरात भक्तिमय वातावरण आणि नवे चैतन्य निर्माण झाले.
ठाणे-रायगड जिल्ह्यातील भाविकांची मोठी उपस्थिती, जय श्रीरामच्या घोषणा आणि पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात हा उत्सव शांततेत पार पडला.
Kalyan, Thane | Aug 27, 2026