हिंगणा: इंदिरामातानगरात असामाजिक तत्त्वांकडून वाहनांची तोडफोड जय
Hingna, Nagpur | Mar 24, 2026 डिगडोह नगरपरिषदेंतर्गत येणाऱ्या इंदिरामातानगरात काही असामाजिकतत्त्वांकडून रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. या भागात तरुणांच्या एका टोळक्याने घुसून दुचाकी, कार, ऑटोरिक्षा या वाहनांच्या काचा फोडल्या. लोक जमा होताच त्यांनी पळ काढला.यानंतर येथील काही महिला व पुरुषांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या.