हिंगणा: वर्धा मार्गावरच्या शुअरटेक हॉस्पिटलसमोरील वाहनाच्या धडकेत दुचाकीचालकाचा मृत्यू
Hingna, Nagpur | Apr 1, 2026 कामावरून घरी परत येत असताना हिंगणा पोलीस हद्दीतील शुअरटेक हॉस्पिटलसमोरील पुलावर अज्ञात वाहनचालकाने दिलेल्या जोरदार धडकेत मोटारसायकलस्वार गंगाधर राजेराम दुधकवर (४५, रा. धुटी, पोस्ट डोंगरगाव) यांचा उपचारासाठी नेत असताना वाटेत मृत्यू झाला. गंगाधर हे आपल्या होंडा शाइन दुचाकीने खापरी येथून काम आटोपून घरी जात होते. वर्धा मार्गावरच्या शुअरटेक हॉस्पिटलसमोरील पुलावर पाठीमागून त्यांना धडक देत दुसऱ्या वाहनचालकाने पळ काढला.