आसाममध्ये कोलकाता–सैरांग एक्स्प्रेस रुळावरून घसरली; इंजिनसह पाच डबे रुळावरून उतरले!
आसाम : आसाममधील कामरूप (मेट्रो) जिल्ह्यातील दिगारू रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी सुमारे ६ वाजून ५४ मिनिटांनी कोलकाता–सैरांग एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १३१२५) चा भीषण रेल्वे अपघात घडला.
या दुर्घटनेत रेल्वेचे इंजिन आणि पाच डबे रुळावरून घसरले. अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने बचावकार्य हाती घेत प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. प्राथमिक माहितीनुसार, सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
#Assam #TrainAccident #KolkataSairangExpress #IndianRailways #BreakingNews
Pune City, Pune | Nov 11, 2026