गोकुळ दूध संघाचा सत्तासंघर्ष चिघळला! सरकारी संचालकांच्या मतदान अधिकारावरून शेतकरी आक्रमक
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघातील सत्तासंघर्षाला आता नवे वळण मिळाले आहे. १९ ऑक्टोबरच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागा जिंकल्या, तर महायुतीला १२ जागा मिळाल्या.
त्यानंतर राज्य सरकारने सहकारी संस्था कायद्यात अध्यादेशाद्वारे बदल करून पात्र संस्थांमध्ये सरकारी सदस्य नियुक्त करण्याची तरतूद केली. यातील चार सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आल्याने दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले आणि सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात संघर्ष मोर्चा काढण्यात आला.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने अध्यादेशाला स्थगिती देण्यास नकार दिला; मात्र सरकारी सदस्यांची मतपत्रिका स्वतंत्र ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे गोकुळमधील सत्तासंघर्षाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
#GokulDudhSangh #Kolhapur #SatejPatil #MaharashtraPolitics #CooperativeSociety
Pune City, Pune | Nov 11, 2026