२०२४ च्या निवडणुकांवर मोठा सवाल! ५१ मतदारसंघांत मतदान आणि EVM मोजणीत विसंगती
२०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांबाबत 'द रिपोर्टर्स कलेक्टिव्ह' या स्वतंत्र शोधपत्रकारिता संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
महाराष्ट्र, हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील ५१ मतदारसंघांच्या निवडणूक नोंदींमध्ये विसंगती आढळल्याचा अहवालात दावा करण्यात आला आहे. यापैकी १९ मतदारसंघांत मतदानासाठी आलेल्या मतदारांची संख्या शून्य किंवा 'निल' अशी नोंदवण्यात आली, तर ३२ मतदारसंघांत मतदानाची नोंद आणि EVM वरील मतमोजणीचे आकडे जुळले नाहीत.
हरियाणातील कैथल मतदारसंघात केवळ २१५ मतदारांनी मतदान केल्याची अंतर्गत नोंद असताना EVM वर १ लाख ६७ हजार २८५ मतांची मोजणी झाल्याचे अहवालात नमूद आहे.
डिसेंबर २०२४ मध्ये निवडणूक नियमांमध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीमुळे निवडणुकीशी संबंधित काही नोंदी आणि सीस�
Pune City, Pune | Nov 11, 2026