अवैध वसुली करण्यासाठी आलेल्या पोलिसालाच भरावा लागला नुकसानभरपाईचा दंड; ट्रकचालकाने शिकवला धडा!
धक्कादायक प्रकार : ट्रकचालकाकडून कथित अवैध वसुली करण्यासाठी आलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने पैसे देण्यास नकार मिळताच संतापाच्या भरात ट्रकच्या बोनेटवर चढून गाडीची काच फोडल्याचा प्रकार समोर आला आहे.
मात्र, त्यानंतर ट्रकचालकाने असा काही पवित्रा घेतला की संपूर्ण प्रकरणालाच वेगळे वळण मिळाले. ट्रकच्या काचेचे नुकसान केल्यामुळे संबंधित पोलिस कर्मचाऱ्यालाच नुकसानभरपाई द्यावी लागल्याचा दावा केला जात आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
#PoliceMisconduct #TruckDriver #ViralVideo #Corruption #BreakingNews
Pune City, Pune | Nov 11, 2026