धुळे: शिवाजी विद्या प्रसारक संस्थेजवळ महापालिका प्रशासनाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते बेडसे यांनी अंघोळ करून केले आंदोलन.
Dhule, Dhule | Aug 25, 2024 शिवाजी विद्या प्रसारक संस्थे जवळ महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे यांनी आंघोळ करत प्रशासनाचा केला निषेध. शिवाजी विद्या प्रसारक संस्थे जवळ गेल्या वर्षभरापासून भूमिगत गटारीचे काम सुरू आहे. परंतु या ठिकाणी धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनला या भूमिगत गटारीचे कामामुळे गळती लागली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. यामुळे महापालिका प्रशासनाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते बेडसे यांनी या ठिकाणी आंघोळ करत प्रशासनाचा निषेध केला