धुळे: अक्कलपाडा धरणातून पाण्याचा विसर्ग; पांझरा नदीत ७७०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग
Dhule, Dhule | Aug 25, 2024 धुळे जिल्ह्यातील पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सध्या जोरदार पाऊस होत असून, अक्कलपाडा प्रकल्पात पाणी साठवण क्षमतेच्या पलीकडे वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, दि. 25 ऑगस्ट रोजी सकाळी 7.00 वाजता अक्कलपाडा धरणातून 7 हजर 700 क्युसेक इतका पाणी विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पुढील काही तासांत पाणी विसर्गाची मात्रा आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.