धुळे: धुळे शहरात 80 संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा उभारणार; पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची माहिती
Dhule, Dhule | Aug 24, 2024 धुळे शहरातील सरासरी ८० संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही संनियंत्रण यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. याकामी एकूण दोन कोटी १९ लाख १३ हजारांचा खर्च अपेक्षित आहे. अडिच महिन्यात हे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने तरतुदीनुसार कार्यवाही सुरू केली आहे.