धुळे: भात नदीला आलेला पुरामुळे फरशी पूल पाण्याखाली जाऊन तिसगाव ढंडाणे गावासह अनेक गावांचा तुटला संपर्क
Dhule, Dhule | Aug 24, 2024 भात नदीला आलेला पुरामुळे फरशी पूल पाण्याखाली जाऊन परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे, आणि यामुळे नदी नाले ओसांडून वाहू लागले आहेत, धुळे तालुक्यातील भात नदीला देखील मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे धुळे तालुक्यातील तिसगाव ढंडाणे येथील फरशी पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे, नदीला आलेल्या पुरामुळे हा फरशी पूल संपूर्णतः पाण्याखाली गेल्यामुळे जवळपास सात ते आठ गावांचा संपर्क देखील तुटला आहे.