सावनेर: खापरखेडा कोराडी मंदिर मार्गावर दोन दुचाकीची धडक, एक गंभीर
Savner, Nagpur | Oct 14, 2026 खापरखेडा कोराडी मंदिर मार्गावर भव्वस शाळेकडे जाणाऱ्या टी पॉइंट अलीकडे मंगळवारी 13 ऑक्टोबर पहाटे सहा वाजताच्या सुमारास दोन दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही दुचिकस्वार जखमी झाले असून त्यापैकी गजानन केबट यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील मेयो रुग्णालयात हलविण्यात आले आहे