हिंगणघाट: नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर रिमडोह परिसरात अंमली पदार्थ विक्री करण्यावर गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडक कारवाई
हिंगणघाट शहरातील नागपूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील रीमडोह परीसरात शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण पथकाने अंमली पदार्थ विक्री करण्याविरूध्द धडक कारवाई करीत १ लाख २९ हजार ९५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.प्राप्त माहितीनुसार शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण पथकाला एक इसम मॅफेड्रान नावाचे अंमली पदार्थ शहरात विक्रीसाठी आणत असल्याची गुप्त माहिती मिळताच पथकाने सापडा रचून कारवाई केली.