हिंगणघाट: हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर येथील युवकांनी स्वखर्चातून पोलीस भरती सराव करण्याकरता मैदान केले तयार
हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपुर या गावातील अनेक युवक पोलीस भरती चा अभ्यास व सराव करीत आहे . पोलीस भरती देण्याकरता वर्षभर सराव करावा लागतो गावातील युवकांना प्रॅक्टिस करण्याकरता यशवंत शाळेमध्ये मैदान होतं मात्र तिथे पावसामुळे सर्व चिखल तयार झाला होता त्यामुळे तिथे प्रॅक्टिस करणे खूप अवघड झाले होते गावातील युवकांनी स्वखर्चातून यशवंत शाळेत मुरूम टाकून ग्राउंड तयार केले आहे .